नाविन्यपूर्ण

१) जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२२-२३ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतुन स्पर्धा परीक्षा व सरळसेवा परीक्षा मार्गदर्शन MPSC/UPSC परीक्षांसाठी जिल्ह्यातील युवक व युवतींना ऑनलाईन प्रशिक्षण देणे.
महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण २०१२ मधील प्राधान्य बाबींमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याबाबतचा शासन निर्णय अद्यापपर्यत निर्गमित झालेला नसल्यामुळे, युवा धोरणाअंतर्गत युवकांच्या सर्वागिण विकासाकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा वार्षिक योजनेत अंतर्गत अनुज्ञेय असणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेतुन धुळे जिल्हयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याचा या कार्यालयाचा उद्देश होता. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गरीब व होतकरु विद्यार्थी, युवक व युवती यांना गुणवत्तेनुसार पहिल्या ५०१ विद्यार्थ्यांना यूपीएससी व एमपीएससी परीक्षेचे मराठी माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण व सरळ सेवा परीक्षेची तयारी करणा-या इतर सर्व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हा नियोजन समिती, धुळे यांच्या कडून नाविन्यपूर्ण योजनेतुन रु. २३६.०० लक्ष रक्कम तरदूत उपलब्ध करून देण्यांत आली होती. त्यानुसार सह्याद्री पब्लिकेशन, पुणे संचलित सह्याद्री आय.ए.एस.अकॅडमी पुणे, या संस्थे मार्फत धुळे जिल्ह्यातील एकूण ४७१० गरीब व होतकरु विद्यार्थी, युवक व युवती यांना MPSC राज्यसेवा नवीन पॅटर्न + UPSC परीक्षा पूर्व + मुख्य + मुलाखत यासाठी मराठी माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण यशस्वीपणे दिले आहे. त्याचा फायदा धुळे जिल्ह्यातील गरीब व होतकरु विद्यार्थी, युवक व युवती यांना नक्कीच झाला आहे.